महाराष्ट्र आणि जॉर्जियाच्या पैलवानामध्ये होणार पहिली लढत
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूरची ग्राम देवता श्री चांगळेश्वरी देवीची यात्रेला 25 एप्रिल पासून प्रारंभी होणार आहे. या यात्रेनिमित्त महाराष्ट्र मैदान येळ्ळूर येथे जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य केसरीसाठी पहिली लढत होणार असून महाराष्ट्र आणि जॉर्जियाच्या पैलवानामध्ये ही लढत होणार आहे. याबाबत आतापासूनच येळ्ळूर महाराष्ट्र मैदानच्या समितीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मैदान भरविण्यात आले नव्हते. त्यामुळे कुस्ती शौकिनांचा हिरमोड झाला होता. दक्षिण भारतातील सर्वात मोठे मैदान म्हणून येळ्ळूरच्या आखाडय़ाकडे पाहिले जाते. या आखाडय़ात देशातील नामांकित मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या आहेत. यावषी समालोचक कै. दत्ता हट्टीकर आणि पै. मारुती कुगजी यांच्या स्मरणार्थ या कुस्त्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावषी हा आखाडा भरविण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून आखाडा समितीचे अध्यक्ष प्रदीप देसाई, नागेंद्र पाखरे, दौलत कुगजी यांच्यासह इतर कार्यकर्ते आतापासूनच तयारीला लागले आहेत. विविध पैलवानांच्या गाठी भेटी घेवून कुस्ती नियोजनाबाबत जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.