प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूरची श्री ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्ती आखाडा भरविला जातो. मागील वषी या येळ्ळूर महाराष्ट्र आखाडय़ाला शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतील योग्य उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन केले. त्यामुळे त्यांच्यासह येळ्ळूर कुस्ती आखाडय़ाच्या पदाधिकाऱयांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात सुरू आहे. काही जण हजर न झाल्यामुळे त्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
या खटल्याला संभाजी भिडे गुरुजी, दुद्दाप्पा बागेवाडी आणि विलास नंदी हे हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना वॉरंटदेखील बजावण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांसह शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, येळ्ळूर कुस्ती आखाडय़ाचे प्रदीप देसाई, डी. जी. पाटील, नागेंद्र पाखरे, मधू पाटील आणि लकी मुतगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्य़ातील मारुती कुगजी यांचे निधन झाले.
गुरुवारी या खटल्याची सुनावणी होती. मात्र वरील तिघेजण गैरहजर राहिले. त्यामुळे हा खटला 24 मार्च 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या खटल्यात या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर हे काम पाहत आहेत.