प्रतिनिधी / येळ्ळूर
गणपत गल्ली, येळ्ळूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महिला भगिनींनी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्या सुवर्णा कृष्णा बिजगरकर आणि रुपा भीमराव पुण्याण्णावर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका करुणा मारुती तम्मुचे यांनी केले. महिलांनी स्वकर्तृत्वासाठी पुढे येणे गरजेचे आहे. केवळ आपल्या कुटुंबामध्येच न राहता समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घ्यावा. याचबरोबर समाजातील तळागाळातील जनतेला मदतीचा हात आणि मार्गदर्शन करावे, असे आवाहन करुणा तम्मुचे यांनी
केले.
यावेळी रेणुका पुंडलिक पाटील, मंगला बाबुराव मुरकुटे, रेखा राणोजी मुरकुटे यांनी उपस्थित महिलांना आणि पाहुण्यांना हळदीकुंकू दिले. शेवटी उज्ज्वला प्रमोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. गेल्या 11 वर्षांपासून हा उपक्रम गणपत गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.