ग्रामपंचायत सदस्यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / येळ्ळूर
बेळगाव तालुक्मयात एक मोठे गाव म्हणून येळ्ळूर गावाकडे पाहिले जाते. या गावची लोकसंख्या 20 हजारांपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस अधिक प्रमाणात उपलब्ध करावी, या मागणीसाठी येळ्ळूर ग्रामपंचायत टास्कफोर्स कमिटीच्यावतीने
व्हॅक्सिनडेपो येथील आरसीएच अधिकारी आय. पी. गडाद यांना निवेदन देण्यात आले.
लस घेण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू आहे. वृद्ध, महिला यासह साऱयांचीच परवड होत आहे. पहाटे 3 पासूनच रांगा लावण्यात येत आहेत. रांगा लावूनही अचानकपणे लस देण्याच्या ठिकाणामध्ये बदल केला जात आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडत आहे. वास्तविक लस देताना त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गावच्या लोकसंख्येच्या मानाने लस उपलब्ध करणे हे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. गावच्या लोकसंख्येच्या मानाने दररोज 500 जणांना ही प्रतिबंधक लस उपलब्ध करावी. कारण टप्प्याटप्प्याने लस दिल्यास साऱयांनाच त्याचा फायदा होणार आहे. सर्वसामान्य जनतेबरोबरच आरोग्य विभागालाही त्रास होणार नाही. तेंव्हा नियोजनबद्धरित्या सर्वांसाठी खुल्या पद्धतीने लसीची उपलब्धता करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, पीडीओ अरुण नायक, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, राकेश परीट, दयानंद उघाडे, परशराम परीट, मनीषा घाडी, सुवर्ण बिजगरकर, शालन पाटील, वनिता परीट, सोनाली येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.