म. ए. समिती कार्यकर्त्यांचा निर्धार
प्रतिनिधी/ येळ्ळूर
ग्राम पंचायतीची निवडणूक येत्या 22 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत येळ्ळूर ग्राम पंचायतीवर भगवा ध्वज फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. येळ्ळूर विभाग समितीची बैठक समितीच्या कार्यालयात पार पाडली. यावेळी कार्यकर्त्यांनी हा निर्धार केला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी हे होते.
समितीच्या लढय़ात झोकून देणाऱया कार्यकर्त्यांना तसेच जनसामान्यांच्या पसंतीच्या समाजकारण व राजकारण यांची सांगड घालून कार्य करणाऱया अशा कार्यकर्त्याचा विचार केला जाणार आहे. समितीशी एकनि÷ राहणाऱयांना उमेदवारी देण्याबाबत अनेकांनी विचार व्यक्त केले.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन निवडणुकीचा उद्देश स्पष्ट केला. कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांनी वॉर्ड रचनेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी, तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस एल. आय. पाटील, मारुती धामणेकर, वामन पाटील, शिवाजी पाटील, रामदास धुळजी, सतीश पाटील, जोतिबा कणबरकर, बाळकृष्ण काकतकर यांनी यावेळी विचार व्यक्त केले.
या बैठकीला एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, शिवाजी कदम, उपाध्यक्ष राजू पावले, रमेश मेणसे, सुभाष धुळजी, उदय जाधव, शिवाजी गोरल, तुकाराम टक्केकर, वाय. सी. इंगळे, दौलत पाटील, नारायण बस्तवाडकर, नारायण कुंडेकर, अजित पाटील, प्रकाश पाटील, सुरज गोरल, राजू उघाडे, राकेश परीट, परशराम परीट, सतीश देसूरकर, नागेश बोबाटे, कृष्णा शहापूरकर, भीमराव पुण्यण्णावर, भरत मासेकर, परशराम घाडी, बाळकृष्ण पाटील, विकास पाटील, शिवाजी नांदुरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.