शिवाजी नांदुरकर विजयी
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर येथील वॉर्ड क्रमांक 8 ची पोटनिवडणूक झाली. यामध्ये म. ए. समितीने बाजी मारली असून. म. ए. समितीचे शिवाजी जोतिबा नांदुरकर 317 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी तानाजी हलगेकर 226, परशराम मोटराचे 67, विजय धुळजी यांना 71 अशी मते पडली आहेत. तर 15 मते बाद ठरविण्यात आली आहेत.