प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर मुख्य रस्त्यावरील नाल्याशेजारीच गावातील काही जण कचरा टाकत आहेत. शाळेशेजारीच हा कचरा असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे हा कचरा ग्राम पंचायतीने हटवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे या कचऱयामुळे मोकाट कुत्री त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. ती कुत्री अचानक लहान मुलांवर आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हा कचरा साचून आहे. या ठिकाणी नागरिकांनीही कचरा फेकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कचऱयासमोरच चांगळेश्वरी हायस्कूल आहे. त्याचबरोबर थोडय़ाच अंतरावर महाराष्ट्र हायस्कूल असून त्या ठिकाणीही विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. नागरिक व महिलाही येथून ये-जा करत आहेत. तेव्हा हा कचरा तातडीने हटवावा, अशी मागणी होत आहे.