कामगारांना प्रथमोपचार किटचे वाटप : तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांकडून सूचना
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत कचरा विघटन केंद्र तसेच इतर कामे सुरू आहेत. त्यांची पाहणी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर यांनी केली. यावेळी रोहयोमध्ये काम करणाऱया महिलांना प्रथमोपचार किटचे वाटपदेखील करण्यात आले आहे. यावेळी विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
येळ्ळूरमध्ये रोहयोंतर्गत काही कामे सुरू करण्यात आली आहेत. कचरा विघटन तसेच इतर कामांना चालना देण्यात आली आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, शिवाजी नांदूरकर, अरविंद पाटील, राकेश परिट, शशी धुळजी, कल्लाप्पा मेलगे यांच्यासह ग्रा. पं. पीडीओ अरुण नायक उपस्थित होते.
रोहयोंतर्गत काही कामांचा शुभारंभ करण्यात आला. ती कामे पूर्ण करण्याबाबत ता. पं. अधिकाऱयांनी सूचना केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच पीडीओंनीदेखील लवकरात लवकर कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन दिले.