जि.पं.माजी सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातून व्यायामशाळा : लाभ घेण्याचे तरुणांना आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा पंचायत माजी सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातून येळ्ळूर येथे व्यायामशाळेला 10 लाखांचा निधी मंजूर झाला. या निधीमधून व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली. त्याचे उद्घाटन जिल्हा पंचायत माजी सदस्य रमेश गोरल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येळ्ळूर ग्रा. पं. उपाध्यक्षा लक्ष्मी भरत मासेकर उपस्थित होत्या.
युवजन सबलीकरण खात्याच्या योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला होता. या व्यायामशाळेचा तरुणांनी फायदा घ्यावा, व्यसनापासून दूर राहावे आणि समाजासाठी स्वतःला वाहून घ्यावे, असे आवाहन रमेश गोरल यांनी यावेळी केले. रमेश गोरल यांनी केलेल्या कार्याबद्दल येळ्ळूरवासीयांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य विलास बेडरे, जोतिबा चौगुले, राजू डोण्याण्णावर, राकेश परीट यांच्यासह कृष्णा बिजगरकर, रमेश धामणेकर, यल्लाप्पा गोरल, चांगाप्पा धामणेकर, परशराम धामणेकर, प्रताप गोरल, भरमा नंदिहळ्ळी, पुरुषोत्तम गोरल, हेमंत पाटील, पप्पू कुंडेकर, विक्रम गोरल आदी उपस्थित होते.