डीसीसी बँकेचे संचालक राजेंद्र अंकलगी यांचा सत्कार
प्रतिनिधी / येळ्ळूर
शेतकरी विकास प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र अंकलगी, बेळगाव मार्केटिंग सोसायटीचे नूतन संचालक प्रदीप देसाई आणि नुकत्याच येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 5 मधून विजयी झालेले ग्राम पंचायत सदस्य राजू डोण्याण्णावर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर शेतकरी विकास कृषी पत्तीन सोसायटीचे संस्थापक दौलत कुगजी होते.
येळ्ळूर येथे नुकत्याच स्थापन झालेल्या शेतकरी विकास पीकेपीएस सोसायटीने जो व्यवहार सुरळीत केला आहे तो कौतुकास्पद आहे. तालुक्मयातील इतर सोसायटींपेक्षा या सोसायटीने सहकार क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे यापुढे मार्केटिंग सोसायटीला येळ्ळूरचा एक संचालक कायमस्वरुपी राहील, असे उद्गार डीसीसी बँकेचे संचालक राजेंद्र अंकलगी यांनी काढले.
यावेळी डीसीसी बँकेचे बँक निरीक्षक अरुण पाटील, तालुका नियंत्रणाधिकारी बसवराज कुरेर, सिनीयर बँक इनिस्पेक्टर आर. बी. पाच्छापुरे, दक्षिण विभागाचे बँक इन्स्पेक्टर प्रशांत सदलगी, पीएलडी बँकेचे संचालक मुशाप्पा हट्टी, बडाल अंकलगी पीकेपीएसचे चेअरमन प्रतिक अंकलगी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी येळ्ळूर पीकेपीएस सोसायटीच्या कर्मचाऱयांचादेखील राजेंद्र अंकलगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतकरी सोसायटीचे व्हा. चेअरमन विलास नंदी, संचालक श्रीधर कानशिडे, दीपक कर्लेकर, भोला पाखरे, जोतिबा पाटील, हणमंत पाटील, अभिजित पाटील, परशराम कंग्राळकर, मारुती कुगजी, लक्ष्मण मजुकर, हरिष पाटील, गजानन पाटील, यल्लाप्पा तोपिनकट्टी, भीमा सायनेकर याचबरोबर सोसायटीचे कर्मचारी, भागधारक, शेतकरी उपस्थित होते.
संचालक डी. जी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर दीपक कर्लेकर यांनी आभार मानले.