प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर साहित्य संघाच्यावतीने 15 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 2 फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी उद्धव कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. परमेश्वरनगर येथील येळ्ळूरवाडी शाळेच्या मैदानामध्ये हे संमेलन चार सत्रात होणार आहे. या संमेलनाचे यावर्षी खास आकर्षण म्हणजे सिनेअभिनेता सचिन खेडेकर हे उपस्थित राहणार आहेत.
येळ्ळूर साहित्य संमेलनाला दरवर्षीच अभिनेत्यांची हजेरी असते. आजपर्यंत दिग्गज अभिनेत्यांनी भेट दिली आहे. त्यामुळे या संमेलनाला मोठी गर्दी असते. अध्यक्षपदी उद्धव कांबळे यांची निवड झाली असून ते एक पोलीस खात्यातील सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे शिक्षण एम ए (समाजशास्त्र) झाले आहे.
1983 साली संघ लोकशाही आयोगाच्या परीक्षेद्वारे भारतीय पोलीस सेवेत प्रवेश मिळविला. मराठी माध्यमातून उत्तीर्ण होणारे हे पहिले महाराष्ट्रीयन अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पोलीस अधिक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक अशी पदे भूषविली आहेत. 2012 साली होमगार्ड व नागरी संरक्षण विभागातून अप्पर पोलीस महासंचालक म्हणून ते निवृत्त झाले. त्यांनी विविध पुस्तके व लेख लिहिले आहेत.
त्यांनी चित्रपटामध्ये आणि मालिकामध्ये काम केले आहे. मराठी करोडपती या मालिकेचे त्यांनी सूत्रसंचालन देखील केले आहे.