लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी कोरोनाबाधित सापडल्यामुळे योगी आदित्यनाथ यापूर्वीच आयसोलेशनमध्ये गेले आहेत. कोरोनाची काही लक्षणे दिसताच मी तातडीने चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे डॉक्टरांच्या निर्देशाप्रमाणे नियमांचे पालन करत मी होम आयसोलेशनमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.