प्रतिनिधी/ काणकोण
उत्तर प्रदेशातील बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या परिवाराशी झालेल्या गैरवर्तनाचा निषेध करून काणकोणच्या काँग्रेस परिवाराने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन केले. तेथील पोलीस यंत्रणेने पीडिताच्या कुटुंबाला आपल्या मुलीचे अंत्यदर्शन देखील घ्यायला दिले नाही. बेटी बचावो, बेटी पढावो असा नारा देणाऱया भाजप सरकारने लोकशाहीचा खून केला, अशा शब्दांत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. काणकोण गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रलय भगत, राज्य समितीचे सचिव महादेव देसाई यांनी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करताना काणकोण मतदारसंघातील प्रत्येक भागात जाऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कृत्याचा पाढा वाचला जाईल, असे सांगितले.