लखनौ
उत्तर प्रदेशमधील योगी सरकार 3 किंवा 4 सप्टेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकते. यामध्ये 7 नवीन मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता असून नवोदित मंत्र्यांची नावेही निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच भाजपमध्ये सामील झालेल्या जितिन प्रसाद आणि संजय निषाद यांची नावे संभाव्य मंत्र्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. योगी सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी जातीचे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने काही जणांना मंत्रिमंडळात तर काही जणांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात येत आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी उत्तर प्रदेशात निवडणूक होत असल्याने त्यापूर्वीचा हा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल असणार आहे.