ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारला 2021-22 या आर्थिक वर्षात 36 हजार 208 कोटींचा महसूल मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, दारूच्या दुकानांवर लावलेल्या परवाना शुल्क आणि अबकारी करातून उत्तरप्रदेश सरकारला या वर्षात 36,208.44 कोटींचा महसूल मिळाला आहे. योगी सरकारच्या पहिल्या चार वर्षांमध्ये म्हणजेच आर्थिक वर्ष 2017-18 ते 2020-2021 दरम्यान, 2,076 नवीन दारू दुकानांना परवाना दिला होता. मार्च 2021 मध्ये दारूच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. सरकारने कोरोनामुळे दारूवर कोविड उपकर लावला होता. त्यामुळे 10 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत दारूची किंमत वाढली होती. कोरोनाच्या तीन लाटा आणि लॉकडाऊन असतानाही आम्ही 36,000 कोटींहून अधिक महसूल मिळवला आहे.