हैदराबाद येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक राज्य ऍथलेटीक संघटना आयोजित खुल्या राज्यस्तरीय ऍथलेटीक्स स्पर्धेत बेळगाव एमएलआयआरसीचा खेळाडू योगेश पाटीलने 110 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. हैदराबाद येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची कर्नाटक संघात निवड झाली आहे.
बेंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेत योगेश पाटीलने 110 मीटर अडथळा शर्यत स्पर्धेत पहिल्या फेरीत दुसरा क्रमांक पटकाविला होता. पण उपांत्य फेरीत पहिला क्रमांक घेम अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. अंतिम फेरीत सर्व 8 खेळाडू तुल्यबळ असल्यामुळे शर्यत चुरशीची होती. पण योगेशने चमक दाखवून सुवर्णपदक पटकाविले. त्याला मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. 23 ते 26 जून दरम्यान हैदराबाद येथे होणाऱया राष्ट्रीय ऍथलेटीक्स स्पर्धेसाठी योगेशची कर्नाटक संघात निवड झाली आहे. त्याला ऍथलेटीक्स प्रशिक्षिक शामला पाटील, प्रदीप जुवेकर, सेनादलच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.