प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील रंकाळा तलावात बुडून फातिमा सिकंदर मुजावर (वय 42 रा. लक्षतीर्थ वसाहत) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह राजघाट परिसरात पाण्यावर तरंगताना आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी फातिमा यांचे भाऊ दिलावर मुजावर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.