प्रतिनिधी /राय
सांतेमळ -राय येथील श्री सातेरी कामाक्षी देवालयाच्या प्राकारात गेली अनेक दशके सेवा करीत असलेले घोगळ -मडगाव येथील दामु नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.
देवस्थानच्या प्राकारात आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कुडतरीचे आमदार आलेक्स रिजीनाल्द लॉरेन्सो यांच्याहस्ते श्री. नार्वेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर देवस्थानचे अध्यक्ष जीवनदास बोरकर, उपाध्यक्ष नवनाथ शेट शिरोडकर, सचिव अशोक रिवणकर उपस्थित होते.
सुरवातीला, श्री. बोरकर यांनी उपस्थितांचे स्वागत करताना येत्यावर्षी येथील सत्य नारायण महापूजेला 75 वर्षे होणार असून तो धार्मीक कार्यक्रम थाटामाटात साजरा करुया असे स्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आम. लॉरेन्सो यांनीही समयोचित भाषण केले.
या पूजनोत्सवाच्या कार्यक्रमात दोन नाटके सादर करण्यात आली. दोन्ही नाटकांना रसिक मंडळीनी चांगली दाद दिली.