प्रतिनिधी /पणजी
कलाअकादमीत नाटय़शिक्षक म्हणून सेवा बजावलेले नाटय़ लेखक, दिग्दर्शक आणि नाटय़ कलाकार प्रा. अफसर हुसेन यांचे शनिवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुळ राजस्थान येथील असलेले अफसर हुसेन हे गेल्या 31 वर्षापासून आपल्या पुटुंबासह गोव्यात मोन्ते गिरी येथे स्वताच्या घरात राहत होते. मंगळवारी सकाळी 10 वाजता अफसर हुसेने यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणला जाणार असून 11 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल नंतर अंत्यसंस्कार केले जातील.
अफसर हुसेन यांनी सुमारे 19 वर्षे कलाअकादमीत नाटय़शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. माईम आणि मुव्हमेंट बेस नाटय़ कला यात त्यांचा हातखंड होता. त्यांच्या वेशेष शास्त्रीय नाटय़कलेच्या आधारे त्यांनी एक उत्कृष्ट रंगकर्मी म्हणून गोव्यात आपली ओळख निर्माण केली होती. अफसर हुसेन यांच्या हाताखाली नाटय़ शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी गोव्यात तसेच गोव्याबाहेर असून त्यांच्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी अफसर हुसेन यांच्या निधनाबद्दल दुखः व्यक्त केले आहे.
फाईनआर्ट कलेत (चित्रकला) शिक्षण पूर्ण केल्यानंतर अफसर हुसेन यांनी राष्ट्रीय नाटय़ विद्यालय दिल्ली (एनएसडी) येथे तीन वर्षाचे नाटय़ प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी तेनाली रामा, व इतर अनेक टीव्ही मालीकेत काम केले होते. एक पात्री अभिनय तसेच अनेक नाटकातून त्यांनी काम केले होते. त्यात महाप्रस्थ, वह तिसरास किस्सा, आणि काला गुलाब ही त्यांची नाटके चर्चेत आहेत. देश भरात त्यांनी विविध भाषेतून नाटके सादर केली होती. देशाच्या विविध भागात त्यांनी नाटय़ शिबिरेही घेतली होती. हे सगळे करीत असताना ते पच्छिम क्षेत्र केंद्र उदयपूर येथे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले होते. दरम्यान 1989 व 90 दोनवेळा ते गोव्यात आले होते. 1991 साली अफसर हुसेन हे नाटय़शिक्षक म्हणून कलाअकादमीत रुजू झाले होते. दरम्यान ते कला अकादमीच्या रंगमेळा कंपनीचे प्रमुख म्हणूनही काम पाहत होते.
गोव्याच्या नाटय़क्षेत्रात अफसरहुसेन यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने गोव्याच्या नाटय़क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतीक्रीया कला व संस्कृतिमंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केली आहे. गोव्याच्या नाटय़कलेला एक वेगळी आणि नवी दिशा देण्याचा अफसर हुसेन यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. कला अकादमीशी त्यांचे जवळचे नाते होते. कित्येक वर्षे त्यांनी नाटय़शिक्षक म्हणून काम केले आहे. निवृत्तीनंतरही ते कलाअकादमीशी निगडीत होते. त्यांच्या अचानक जाण्याने नाटय़कलेला मोठे नुकसान झाले आहे. अफसर हुसेन यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच इश्वर चरणी प्राथना असून त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला दुखःचा आघात पेलण्याची देव त्यांना शक्ती देवो असेही गोविंद गावडे म्हणाले.
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नाटय़क्षेत्रात मोठी हानी झाली असून आम्ही एका नाटय़कलाकारावा आणि नाटय़ शिक्षकाला मुकलो आहोत अशी प्रतिक्रीया कलाअकादमीचे प्र. रामराव वाघ यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच इश्वर चरणी प्राथना. अफसर हुसेन यांच्या अचानक जाण्याने गोव्याच्या नाटय़क्षेत्राला मोठे नुकसान झाले आहे. अशी प्रतीक्रीया रुद्रेश्वर पणजीचे दिपक आमोणकर यांनी व्यक्त केली आहे. गोव्याच्या नाटकांना गोव्या बाहेरची वाट दाखविण्याचे काम अफसर हुसेन यांनी केले आहे असे म्हटल्यास अतीशयोक्ती ठरणार नाही. देशभरात होणाऱया विविध नाटय़महोत्सवात गोव्यातील नाटकांना स्थान मिळवून देण्याचे काम त्यांनी केले होते. केवळ कम अकादमीच्याच नव्हे तर राज्यातील इतर खाजगी नाटय़संस्थानाही त्यांनी देशभरातील नाटय़महोत्सवात सहभागी होण्याची वाट दाखविली होती. गोव्यात अनेक नाटय़शिक्षक आले आणि गेले मात्र त्यांनी एका मर्यादीपर्यंतच काम केले होते. अफसर हुसेन हे गोव्या बाहेरील असले तर गेल्या काही वर्षापासून ते गोमंतकीयच झाले होते. एनएसडीचे विद्यर्थी असूनही साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असाच त्य्स्चा स्वभाव होता. चांगल्या कलाकाराला योग्य दिशा मिळावी मग तो कुठलाही असो असेच त्यांना वाटत होते. कला अकादमीतून निवृत्त झाल्यानंतरही अफसर हुसेन यांनी गोव्यातील अनेक नाटय़ संस्था सोबत काम करून त्यांना गोव्या बाहेर जाण्याची वाट दाखविली आहे. शुक्रवारी आम्ही भेटलो आणि नाटका संदर्भात चर्चाही केली होती. रविवारी पुन्हा भेटणार होतो. मात्र अचानक जे घडले ते खूप वाईट घडले. एका उत्कृष्ट लेखक दिग्दर्शक आणि नाटय़ कलाकाराचे अचानक पडद्य आड जाणे ही न पटणारी गोष्ट आहे. असेही आमोणकर यांनी सांगितले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच इश्वर चरणी प्राथना.