नवी दिल्ली
रंग उत्पादन क्षेत्रात आता आणखी एका कंपनीचा समावेश होणार आहे. ग्रेसीम आता रंग उत्पादनाच्या क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याचे समजते. आदित्य बिर्ला समूहातील कंपनी ग्रेसीम लवकरच रंग उत्पादनात उतरणार असून यासंदर्भात कंपनीच्या तयारीने वेग घेतल्याचे समजते. रंग उत्पादन निर्मितीसाठी कंपनी सुरूवातीला 5 हजार कोटीची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येते. पुढील 3 वर्षाच्या कालावधीत वरील गुंतवणूक केली जाणार असून आगामी काळात एशियन पेंटस् व नेरोलॅक कंपन्यांबरोबर स्पर्धा करण्यासाठी सज्ज होणार आहे.