नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे माजी सरन्यायाधिश आणि विद्यमान राज्यसभा सदस्य न्या. रंजन गोगोई यांच्याविरोधात तृणमूल काँगेसने विषेशाधिकार हनन प्रस्ताव राज्यसभेत सादर केला आहे. एका मुलाखतीत गोगोई यांना त्यांच्या राज्यसभेतील उपस्थिती विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी ‘राज्यसभेत काही महत्वाचा विषय उपस्थित झाला असेल आणि त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता असेल तरच आपण उपस्थित असतो. तसेच आपल्याला जेव्हा मनात येते तेव्हा राज्यसभेत उपस्थित राहता, असे उत्तर दिले होते. हे उत्तर राज्यसभेचा अवमान करणारे आहे, असा आरोप करत तृणमूल काँगेसने हा प्रस्ताव सादर केला.