प्रतिनिधी /बेळगाव
वॉर्ड क्रमांक 39 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रंजन राजू मरवे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सारा परिसर पिंजून काढला आहे. वॉर्डातील प्रत्येक संघ-संस्था त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विविध संघ-संस्था प्रचारादरम्यान त्यांचे स्वागत करून निवडून येण्यासाठी पाठिंबा दर्शवत आहेत.
भारतनगर क्रॉस क्रमांक दोन, तीन, चार, पाच, सहा गोल्लर छावणी, जीवेश्वर मंगल कार्यालय-येळ्ळूर रोड, सोनार गल्ली, अंबाबाई देवस्थान बाजार गल्ली-वडगाव, धामणे रोड, बाजार गल्ली, मलप्रभानगर, लक्ष्मीनगर, कल्याणनगर, ढोर गल्ली, गुरुदेव गल्ली, शिवाजी गल्ली, कोरवी गल्ली या परिसरात झंझावाती प्रचार करण्यात आला. युवक व महिलांचा मोठा प्रतिसाद रंजन यांना मिळत आहे. या प्रभागातील शेतकरी, युवक मंडळे, तरुणवर्ग रंजन यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.