अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने स्वतःचा आगामी चित्रपट ‘छतरीवाली’चे चित्रिकरण संपविले आहे. यासंबंधीची माहिती तिनेच सोशल मीडियावर एक चित्रफित आणि छायाचित्र शेअर करत दिली आहे. यात रकुल ‘छतरीवाली’च्या टीमसोबत रॅप-अप केक कापताना दिसून येते. तेजस प्रभा विजय देओस्कर यांचे दिग्दर्शनात निर्माण झालेल्या या चित्रपटात रकुल एक कॉन्डोम टेस्टरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात रकुल सोबत सुमित व्यास, सतीश कौशिक, राजेश तैलंग, प्राची शाह आणि रिवा अरोरा यासारखे कलाकारही मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. ‘छतरीवाली’ या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून केली जात आहे. लखनौमध्ये याचे चित्रिकरण पार पडले आहे. चित्रपटात रकुलप्रीत उत्तरप्रदेशच्या कनौज शहरातील एका बेरोजगार युवतीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तिला मिळालेली नोकरी सर्वांपासून लपवावी लागत असल्याचे चित्रपटात दर्शविण्यात आले आहे.
Previous Articleशाळेत लिहिले पहिले वाक्य, शिक्षक दंग
Next Article पाकचा अबिद अली रूग्णालयात दाखल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.