प्रतिनिधी / कोल्हापूर
रक्तदानासाठी http://www.kolhapurcollector.com/blooddonation/ या संकेतस्थळावर रक्तदात्यांनी आता फक्त नोंदणी करावी. आवश्यकतेनुसार नोंदणी झालेल्या दात्यांना बोलवले जाईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ब्लड डोनेशन ऍप आणले आहे. जिह्यातील कोरोना प्रादुर्भाव, सद्यस्थितीतील रक्ताची उपलब्धता आणि संभाव्य गरज याची तयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि कोल्हापूर महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने http://www.kolhapurcollector.com/blooddonation/ संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर अधिकाधिक दात्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
नोंदणी करण्यात येणाऱया दात्यांना आवश्यकतेनुसार रक्तपेढय़ा आणि जिल्हा प्रशासनांच्या समन्वयाने रक्तदानासाठी कळवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याची माहिती त्यांनी दिली.