60 हून अधिक नागरिकांकडून रक्तदान
प्रतिनिधी /बेळगाव
हुतात्मा दिनाचे औचित्य साधून गोवावेस रामलिंगवाडी येथील गोवावेसचा राजा या मंडळाच्यावतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 60 हून अधिक नागरिकांनी रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले, सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. मराठी भाषा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी मराठी भाषिक मागील 66 वर्षांपासून लढा देत आहेत. या लढय़ाची धार कमी करण्यासाठी काही तरुणांना हिंदुत्वाच्या नावाखाली राष्ट्रीय पक्ष आमिष दाखवत आहे. परंतु तरुण या आमिषाला बळी न पडता असे अनेक नवे उपक्रम राबवित आहेत, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिराचे बेळगाव ब्लड बँकेच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी सुनील बोकडे, राजकुमार बोकडे, दीपक तुळसकर, प्रवीण पाटील, उमेश भातकांडे, सदानंद बिर्जे, अनिकेत जांगळे, अतुल पारिश्वाडकर, बाळकृष्ण झेंडे, कुणाल कोचेरी, श्रीशैल पाटील, संदेश मधूरकर यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मंडळाने सलग तिसऱया वषी या उपक्रमाचे आयोजन केले होते.