ऑनलाईन टीम / मुंबई :
सामाजिक उत्तरदायित्वाच्या परिपूर्तीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने 21फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला.
नवी मुंबई व पनवेल परिसरातील एकूण 6 ठिकाणी हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये एकूण 357 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये घणसोलीमध्ये 85, वाशी 25, नेरुळमध्ये सर्वाधिक म्हणजेच 102, खारघर 58 तर पनवेलमधील 87 जणांनी रक्तदान केले.
दरम्यान, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांच्या संकल्पेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक संदीप महाजन आणि अविनाश पुरुषे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद कोकणे, शायनी शेट्टी, संदेश शहाणे, अजित पाटील, गिरिजा देव आणि कर्नल अमिताभ यांनी या शिबिरात मोलाचेे योगदान देऊन शिबिर संपन्न केले.