सभापतीराजेशपाटणेकरयांचेआवाहन : ‘लोकमान्य’व‘तरुणभारत’चासमाजोपयोगीउपक्रम
डिचोली/प्रतिनिधी
लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी संस्था व ‘तरुण भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने व पतंजली योग समितीच्या सहकार्याने डिचोली येथील शेटय़े प्राईड बेंक्वेट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. रक्तदान हे श्रेष्टदान असून सर्वांनी रक्तदान करावेत, असे आवाहन यावेळी विशेष उपस्थिती लावलेल्या सभापती राजेश पाटणेकर यांनी केले.
लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी संस्था यावषी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असून त्यानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. रक्तदात्यांना लोकमान्य संस्थेतर्फे प्रमाणपत्र, भेटवस्तू रक्तदाता कार्ड व केप देऊन सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमाला राज्य विधानसभेचे सभापती तथा डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी व डिचोलीचे युवा नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी पतंजली योग समितीचे राज्य प्रमुख कमलेश बांदेकर, लोकमान्य संस्थेचे उत्तर गोवा विभागीय व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, उपव्यवस्थापक अँथनी आजावेदो, चंद्रकांत पै, डॉ. गोविंद काळे, ‘तरुण भारत’चे जनसंपर्क अधिकारी मंगेश काळे, जाहिरात व्यवस्थापक रवींद्र पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
रक्तदानासाठी घाबरण्याचे दिवस गेले : सभापती राजेश पाटणेकर
रक्तदान हे आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ट दान असून कोणाचातरी जीव वाचविण्याचे आजच्या जमान्यातील महत्त्वाचे साधन आहे. पूर्वीच्या काळात लोक रक्तदान करण्यास घाबरत होते. जागृती नसल्याने लोकांच्या मनात विविध शंका निर्माण होत होत्या. मात्र आज तशी परिस्थिती नाही. काळाची गरज ओळखून आज रक्तदाते एखाद्याही रक्तदान शिबिराची जाहिरात पाहूनच रक्तदानासाठी स्वतः स्वेच्छेने उपस्थिती लावतात व रक्तदान करतात. आज रक्तदात्यांची संख्या मोठी आहे. कोणालाही तत्काळ रक्ताची गरज भासल्यास अनेक दाते आपल्याकडील रक्तदान कार्ड देऊन कोणासाठीही रक्ताची गरज पुरवितात किंवा काही रक्तदाते स्वतः रक्त पेढीत उपस्थित राहून रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी तत्पर असतात. ही समाजभावना आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची व गौरवास्पद आहे, असे यावेळी सभापती राजेश पाटणेकर यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना म्हटले.
या शिबिरात अभिजात रॉय, कमलेश बांदेकर, रूपेश मांदेकर, आनंद परब, दत्तराज तेली, रूपेश परब, शिवानंद टोपले, श्रीनिवास नाईक, राकेश बांदेकर, शिवानंद बापे, विधीत कोटकर, संजय म्हापसेकर, वासुदेव वझे, सुप्रिया बर्वे, संजिव पाटील, तुषार केळकर, सुभाष मांदेकर, समीर देसाई, सुमित आपटे, कृष्णा आमोणकर, विठ्ठल हळदणकर, सुनील धारगळकर, अतुल पै धुंगट या रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराला उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील रक्त पेढीचे डॉ. श्रध्दा चोडणकर, सुप्रिया गावकर, निशा गावकर, केर्रन रॉड्रिगीस, निशा महाले, सुलोचना गावस आदींची उपस्थिती होती. या सर्वांनी रक्तदात्यांना योग्य सेवा देताना मार्गदर्शन केले.
यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी संस्थेचे सीताराम काळे, गायत्री दुभाषी नाईक, ममता चिमुलकर, प्रणाली काणेकर, सोनल कुबल, केतन कारापूरकर, अक्षय सिनारी, मुरारी पालकर, प्राची देसाई, सुप्रिया बर्वे, प्रणोती शिलकर, पद्मिनी गावस व इतरांनी संपूर्ण रक्तदान शिबिराची व्यवस्था सांभाळली.
लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी संस्थेची उत्तुंग भरारी
मल्टिपर्पज ही मान्यता असलेल्या लोकमान्य संस्थेचे आज संपूर्ण देशात नाव आहे. बँकींग क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रम आयोजित करून आपल्या लोकांशी या संस्थेने सामाजिक सलोखा उत्कृष्टरित्या राखला आहे. या बँकेच्या घोडदौडीला बदनाम करण्याचे काम काही घटकांकडून कर्नाटक राज्यात घडले जे अत्यंत दुर्दैवी होते. मात्र त्यात खचून न जाता संस्थेने आपली घोडदौड चालूच ठेवली. अखेर सत्य बाहेर आलेच व या संस्थेचे नाव पुन्हा उभारी घेऊ लागले. आज या संस्थेने मारलेली भरारी वाखाणण्याजोगी असून या संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया सभापती राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केली. रक्तपेढीत रक्ताची कमतरता भासू नये म्हणून असे उपक्रम गरजेचे
लोकमान्य संस्था आणि ‘तरुण भारत’तर्फे डिचोलीत या चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आजच्या जीवनात आरोग्यासाठी लागणाऱया इतर सर्व गोष्टी व औषधांबरोबरच रक्तसुध्दा एक आवश्यक घटक बनला आहे. अनेकदा रक्तपेढीत रक्ताची कमतरता असल्याचे ऐकायला येते आणि त्यामुळे एखाद्या आपत्कालीनवेळी कोणालाही रक्ताची गरज भासल्यास सर्वत्र धावपळ उडते. अशा शिबिरांमुळे रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा ठेवण्यास मदत होणार व त्याचा फायदा ऐनवेळी रक्तासाठी गरजू असलेल्या लोकांना होणार. अशी शिबिरे या संस्थेने डिचोलीत यापुढेही आयोजित करावी, आमचे सहकार्य सदैव राहिल, असे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी केले.
लोकमान्य संस्थेने रक्तदात्यांची सूची तयार करावी
रक्तदान हा अत्यंत महत्त्वाचा व मानवसेवेचे व्रत जपणारा उपक्रम लोकमान्य संस्थेने डिचोलीत आयोजित केला आहे. आजच्या काळात संकटात असलेल्यांना वाचविण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून या उपक्रमांकडे पाहिले जाते. लोकमान्य संस्थेने हे शिबिर घेऊन न थांबता दर महिन्यात अशी शिबिरे घ्यावीत. जेणेकरून अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्याची संधी मिळणार. या उपक्रमातून संस्थेने रक्तदात्यांची सूची तयार करावी. शिबिरातून रक्तदान करणाऱया व ऐनवेळी ब्लडबँकेत रक्तदान करण्यासाठी इच्छुकांची यादी तयार करावी, या कार्यात पतंजली योग समितीही सहकार्य करायला तयार आहे. असे केल्यास अनेकदा रक्ताच्या कमतरतेमुळे पुढे ढकलावी लागणाऱया शस्त्रक्रिया, किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे एखाद्याचा जीव जाणे, अशा घटना आटोक्मयात येणार. हे कामही समाजसेवींचे असून त्यासाठी या संस्थेने पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रिया पतंजली योग समितीचे प्रमुख कमलेश बांदेकर यांनी व्यक्त केली.
अशी शिबिरे आजच्या काळात आवश्यक
रक्तदानाला आजच्या काळात मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज कोणावर कोणत्या क्षणी कसली वेळ येणार हे सांगता येत नाही. त्यासाठी रक्तदान करून आपल्या राज्यातील सर्व रक्तपेढय़ा रक्ताच्या मुबलक साठय़ाने भरून राहणे आवश्यक आहे. अनेकदा आपत्कालीन समयी रक्ताची गरज भासत असते. त्यावेळी आपल्याकडे असणारे एक कार्ड कोणाचातरी जीव वाचवू शकते. प्रत्येकवेळी गरज भासते तशी ब्लडबँकेत जाऊन रक्तदान करणे प्रत्येकाला शक्मय नसते. त्यासाठी अशा शिबिरांमध्ये रक्तदात्यांनी व सामान्य लोकांनीही सहभागी होऊन रक्तदान करावे. या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला हा सुंदर उपक्रम आहे, अशी प्रतिक्रिया एलआयसी अधिकारी संजीव पाटील यांनी व्यक्त केली.
रक्तदान करणे म्हणजे कोणाचातरी जीव वाचविणे
आजचे युग जरी बदलत असले व नवनवीन गोष्टी जगात येत असल्या तरी माणसाला जगविण्यासाठी आवश्यक असलेल्या माणसाच्या शरीरातील घटकांना इतर पर्यायच नाही. माणसाच्या अंगातील रक्त हा तर एक अतीमहत्त्वाचा घटक आहे. ज्यावेळी आपण रक्त देतो त्याचवेळी आपण एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी एक पाऊल मारतो, असा त्याचा अर्थ होतो. अशा रक्तदान शिबिरांना आज चांगला प्रतिसाद लाभत आहे. कारण आज समाज जरी आधुनिक व प्रगत बनत चालला असला तरी रक्ताचे महत्त्व काय हे सर्वांनाच माहीत आहे. लोकमान्य संस्थेने हा स्तुत्य उपक्रम राबविला असून असे उपक्रम वारंवार राबवावेत, अशी प्रतिक्रिया शेटय़े प्राईड बेंक्वेट सभागृहाचे मालक रमाकांत शेटय़े यांनी व्यक्त केली.