ऑनलाईन टीम / चंदीगड :
रक्षाबंधनाच्या खास दिवशी हरियाणामधील 9 जिल्ह्यांमध्ये हरियाणा सरकार ‘महिला कॉलेज’ सुरू करणार आहे. मुख्यमंत्री 3 ऑगस्ट रोजी या संदर्भात औपचारिक घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आहेत. याच शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देण्यास सुरुवात केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, आदेशात म्हटले आहे की, सोनीपत मधील भैंसवाल कलां व बरौदा, हिसार मधील अग्रोहा, सिरसा मधील गोरीवाला, भिवानी मधील इस्सरवाल, पंचकूला मधील मोरनी, यमुनानगर मधील प्रताप नगर, कैथल मधील लडाना चाकू, जींद मधील छत्तर आणि नूह मधील फिरोजपुर झिरकामध्ये ही कॉलेज सुरू केली जाणार आहेत.
सध्या असलेल्या महाविद्यालयांमधूनच या कॉलेजांचा कारभार पाहिला जाईल आणि नियमानुसार दाखला प्रक्रियादेखील पूर्ण केली जाईल. या कॉलेजांच्या माध्यमातून आजूबाजूचे गाव आणि शहरातील मुलींना ऍडमिशन देऊन उच्च शिक्षणाची संधी देण्याची सरकारची योजना आहे.