राख्यांच्या खरेदी विक्रित प्रचंड घट
प्रतिनिधी / पणजी
र<<क्षाबंधन या बहिण-भावांच्या सणालाही कोरोनाचा फटका बसला असून राख्यांच्या खरेदी विक्रित मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे रक्षाबंधनसाठी बहिणींना भावाकडे जाणे कठीण बनले असून बाहेरगावी असणाऱया भावांना अनेक बहिणींनी ऑन लाईनच्या माध्यमातून राखी पाठवली आहे.
राज्यात राख्यांची अनेक दुकाने असली तरी तेथे भागिनींची गर्दी दिसून आली नाही. घरात असलेल्या भावाला राखी बांधणे शक्य आहे. जवळपास असलेल्या भावाला देखील बहिण तेथे जाऊन राखी बांधू शकते. परंतु लांब अंतरावर राहणाऱया भावाकडे जाणेही भागिनींना कोरोनाच्या धोक्यामुळे अडचणीचे ठरले आहे. यंदा राख्यांचे दरही बरेच वाढले असून बहुतेक दुकानातून जुनाच साठा विक्रिस असल्याचे दिसून आले. नवीन राख्या आणि त्यांचा स्टॉल भरविण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
या उद्योगातील उलाढालही यंदा मंदावली असून कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक भगिनींनी बाजारात जाऊन राखी खरेदी करण्याचे टाळले. कोरोनाचा एकंदरीत मोठा परिणाम सर्वच सण, उत्सवांवर दिसून येत आहे.