ऑनलाईन टीम / चेन्नई :
अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा केली आहे. ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. तर जानेवारीत नवीन पक्षाचे लॉन्चिंग केले जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांचे राजकारणातील एन्ट्रीबाबत वक्तव्य समोर आले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संकेत मिळाले होते की, रजनीकांत विधानसभा निवडणूक लढू शकतात.
2021मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकांमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या संघटनेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता मिळालेली नाही.
रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटले होते की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.