ऑनलाईन टीम / हैद्राबाद :
देशभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. बॉलीवुडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता साऊथचे सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांच्या फिल्मच्या सेटवरील सात जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रजनीकांत आपल्या आगामी फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या दरम्यान, फिल्म सेटवर उपस्थित असलेल्या सात क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे. हे शूटिंग हैद्राबादमध्ये चालू होते. मात्र, फिल्म सेटवर कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता शूटिंग थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, आतापर्यंत बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रकुल प्रीत सिंह, सनी देओल, कृती सेनेन, नीतू सिंग सह चिरंजीवी आदी कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.