हैदराबाद / वृत्तसंस्था
सुपरस्टार रजनीकांत यांना रविवारी दुपारी इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने शुक्रवारी त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आला असून त्यांना उच्च रक्तदाबाशिवाय इतर कोणताही त्रास नसल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.
दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत हे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांनी 22 डिसेंबर रोजी कोव्हिड-19 संदर्भात चाचणी करून घेतली. पण त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण तरीसुद्धा खबरदारी म्हणून रजनीकांत हे स्वतःच अलगीकरणात गेले होते. त्यानंतर त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.