प्रतिनिधी/बंगळुरू
बंगळुरूचा एकेकाळचा बसचालक आणि सध्याचा सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांनी आपला दादासाहेब फाळके (Dadasaheb Falke) पुरस्कार राजबहादूर (Rajbahadur) यांना अर्पण केला. त्यामुळे फक्त साउथलाच नाही तर अख्ख्या देशाला हा प्रश्न पडला आहे की कोण आहेत राजबहादूर ?
“माझा कर्नाटकातील ( Karnatka) मित्र, बस वाहतूक चालक, माझा सहकारी – राज बहादूर. जेव्हा मी बस कंडक्टर होतो, तेव्हा त्यांनी माझ्यातील अभिनय कौशल्य ओळखले आणि मला चित्रपटसृष्टीत सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले”
भारतातील सर्वोच्च चित्रपट सन्मान, प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतरच्या भाषणादरम्यान रजनीकांत यांनी राज बहादूरची आठवण करून दिली. पण राज बहादूर आहे तरी कोण? पी राज बहादूर,76 वर्षीय सेवानिवृत्त बंगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) ड्रायव्हर आहेत. ते चामराजपेटचे रहिवासी असुन सुरुवातीच्या काळात रजनीकांतला सिनेमात जाण्यास प्रोत्साहन दिले आणि रजनीकांत यांना अडचणीच्या वेळी मदत केली. कॉर्पोरेशन बनण्यापूर्वी राज बहादूर बेंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (BTC) मध्ये काम करत होते आणि रजनीकांत त्यावेळी कंडक्टर होते. रजनीकांत यांना पुरस्कार मिळाल्यावर राज बहादूर आपल्या मित्राला भेटण्यासाठी चेन्नईला जाण्यासाठी इच्छुक आहेत.
“त्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळत असताना माझे नाव घेण्याची गरज नव्हती. त्याच्या बोलण्मयातुन त्याची सचोटी, नम्रता आणि तो आपला प्रवास कधीच विसरला नाही हे दाखवून देतो. रजनी त्याच्या मित्रांना कधीही विसरत नाही कारण त्यांनीच त्याला प्रोत्साहन दिले.त्याच्या नातेवाईकांना भेटलायला जेव्हा तो बंगळुरूला येतो तेव्हा तो त्याच्या मित्रांना भेटतोच,” असे राज बहादूर मीडियाला सांगत होते.