ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेटमधील नेत्या अशी ओळख असलेल्या माजी खासदार रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पृथ्वीराज चौहान, मुकुल वासनिक यांची नावे चर्चेत होती. तर गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा, उत्तमसिंह पवार, अनंत गाडगीळ या नेत्यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, काँग्रेसने रजनी पाटील यांना संधी दिली आहे. त्या माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.