वार्ताहर / औंध
राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे हरणाई उद्योग समुहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी सामाजिक बांधिलकिचे भान ठेवून निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्राला आँक्सिजन मशीन भेट दिली. पुढील काळात देखील प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आँक्सिजनची पातळी कमी होत असल्याने रुग्ण दगावत आहेत. अशा स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात आँक्सिजन उपलब्ध झाला तर रुग्णांना पुढील उपचार मिळेपर्यंत दिलासा मिळेल. ग्रामीण भागात आँक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी हरणाई उद्योग समुहाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला मशीन भेट दिली. तसेच आरोग्य केंद्रातील स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळीआरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधिकारी डॉ.प्रियांका पाटील,धनाजीराव देशमुख,निलेश घार्गे देशमुख,धनंजय जौंजाळ, प्रताप माने,.ए.जे कुंभार , जी.व्ही जाधव,व्ही.टी. शिंदे,गणेश निकाळजे व स्टाफ उपस्थित होता.
निलेश घार्गे यांनी प्रास्ताविक केले. धनाजीराव देशमुख यांनी आभार मानले.