नवी दिल्ली
दुचाकी वाहन निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी रणजीवजीत सिंग यांना बढती दिली आहे. त्यांना कंपनीने चिफ ग्रोथ ऑफिसर (मुख्य विकास अधिकारी) पदावर बढती दिली आहे. या आधी कंपनीमध्ये ते मार्केटींग विभागाचे प्रमुख होते. विपणन, विक्री आणि विक्री पश्चात सेवा या तीन्ही आघाडीवर त्यांनी उत्तम सेवा निभावली आहे. नव्या पदावर ते आपले काम चोख बजावतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.