प्रतिनिधी / बेळगाव
निलजी येथील रणझुंझार शिक्षण संस्थेतर्फे रणझुंझार शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. अशोकराव मोदगेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेचे खजिनदार आप्पाजी अक्षीमनी होते.
शांता पाटील व सरिता देसाई यांनी श्रीकृष्ण नामस्मरण गीत सादर केले. मुख्याध्यापक एम. बी. आजाणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कै. अशोकराव मोदगेकर यांचे चिरंजीव निखिल मोदगेकर, तेजस्वी मोदगेकर, प्रिया मोदगेकर-पाटील हे उपस्थित होते.
संतोष पाटील, विठ्ठल पाटील, विद्यामंदिरचे अध्यक्ष रमेश मोदगेकर, लक्ष्मण गोमाणाचे, बाळकृष्ण पाटील, सिद्धार्थ वरपे, वसंत पाटील, पल्लवी पाटील, मारुती गाडेकर, गुंडू पाटील, किशोर मोदगेकर, कल्लाप्पा कोलकार, सिद्राय पाटील, भरमा पाटील आदींच्या हस्ते अशोकराव मोदगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
एन. व्ही. आपटेकर, सोमनाथ कुरंगी, रमेश मोदगेकर, विठ्ठल पाटील, वसंत पाटील आदींनी अशोकराव मोदगेकर यांच्या कार्याबद्दलची माहिती आपल्या भाषणातून दिली. या कार्यक्रमानिमित्त दहावी परीक्षेत 100 टक्के निकाल लावण्यासाठी प्रयत्न केलेल्या शिक्षकांचा भेटवस्तू देऊन मोदगेकर कुटुंबीयांच्या सदस्यांनी गौरव केला. सूत्रसंचालन नारायण पाटील व आभार सविता अक्षीमनी यांनी मानले.