ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टलाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आलिया होम क्वारंटाइन आहे. स्वतः आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर याला ही कोरोनाची बाधा झाली होती. आलिया तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर ती ताबडतोब घरी गेली. त्यामुळे गंगुबाई काठीयावाडी चित्रपटाचे शूटिंग आता 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख, गायक बप्पी लहरी आदींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पाठोपाठ आता आलिया भट्टची देखील कोरोना पॉझिटीव्ह आली आहे.