ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने पसरत चालला आहे. एकीकडे सरकारकडून लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे, तरी देखील रुग्ण संख्येचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. त्यातच आता चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितनुसार, रणबीर कपूर याला कोरोना झाला असल्याची माहिती त्यांची आई नीतू सिंग यांनी सकाळी दिली होती. त्यानंतर आता संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे. भन्साळी हे गंगूबाई काठियावाडीचे चित्रीकरण करत होते. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. आलिया आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने ही कोरोनाची चाचणी केली आहे.
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आल्या नंतर, त्यांनी लगेच आपल्या आईचीही चाचणी केली. मात्र त्यांची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
संजय लीला भन्साळी मुंबईत गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग करत होते. तर अभिनेता अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी नुकताच सेटवर आला होता.
दरम्यान, संजय भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्याने सिनेमाच्या शूटिंग आणि सिनेमा प्रदर्शित होण्यास अजूनही वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रिझर रिलीज झाला होता.