थंडीच्या दिवसात उष्णता निर्माण करण्यास उपयुक्त
वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी रताळी पिकाचा उपयोग केला जातो. याचा परिणाम बाजारामध्ये रताळी दरात 150 रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विक्रमसिंह कदम्ब-पाटील यांनी दिली. बाजारात चांगल्या प्रतीची रताळी 950 ते 1100 रुपये अशी झाली. सर्वसाधारण रताळी पिकाचा भाव 600 ते 900 असा होता. बाजारात 15 हजार पोती इतकी रताळी आवक होती.
शनिवारी बाजारात कांदा दरात 1000 रुपये, परराज्यातील बटाटा दरात 500 ते 800 रुपयांची घसरण झाली. मात्र, स्थानिक बियाणांसाठी वापरात येणारा बटाटा 200 रुपयांनी वधारला.
कांदा दरात घसरण
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात 1000 रुपयांची घसरण झाली. शनिवारी बाजारात 70 ट्रक इतकी आवक होती. बुधवारी 40 ट्रक इतकी कांदा आवक होती. मागील बाजारापेक्षा 30 ट्रक कांदा आवक जादा होती. याचा परिणाम जावकेवर झाला. त्यामुळे कांदा दरात घसरण झाली असल्याची माहिती व्यापारी संभाजी होनगेकर यांनी दिली.
बाजारात मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रातील कांदा आवक होती तर तुरळक प्रमाणात कर्नाटकातील कांदा होता. 70 ट्रक कांद्यापैकी 5 ट्रक कांदा कर्नाटकातील उर्वरित आवक ही महाराष्ट्रातील होती.
बाजारातील कांद्याचे भाव
गोळी 500 ते 1500 रु.
गुल्टा 1500 ते 1800 रु.
मध्यम/गोळा 2000 ते 2700 रुपये
सफेद 4000 ते 5000 रुपये
बाजारात परराज्यातील बटाटा आवक 15 ट्रक इतकी होती. यामध्ये इंदूर 6 ट्रक, आग्रा 1 ट्रक, तळेगाव 6 ट्रक, कोलार 2 ट्रक इतकी आवक होती. इंदूर आणि आग्रा बटाटा 500 रुपये, तळेगाव आणि कोलारचा बटाटा 1000 रुपयांनी उतरला असल्याची माहिती व्यापारी टी. एस. पाटील यांनी दिली.
बाजारातील बटाटय़ाचे भाव
इंदूर 1500 ते 2500 रु.
आग्रा 2500 ते 2600 रु.
तळेगाव 2000 ते 2200 रु.
कोलार 2500 ते 2800 रु.
बेळगाव तालुक्मयामधील बटाटा बाजारात आवक तुरळक प्रमाणात होती. 80 पिशव्या बटाटा आवक होती. बटाटा आवक संपुष्टात येत असल्याने बियाणांसाठी वापरात येणारा बटाटा 200 रुपयांनी महागला आहे, अशी माहिती व्यापारी संदीप मुंगारी यांनी दिली.
बाजारातील स्थानिक बटाटय़ाचे भाव
गोळी 2200 रु.
मध्यम 3800 ते 4400 रु.
गोळा लाल मातीतील 4500 रु.