प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल रोड येथील तमन्ना आर्केट येथे टी टोस्ट अँड कंपनीच्यावतीने व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया कर्नाटक 2020 या पहिल्या पाच मानांकनमध्ये असलेल्या रती हुलजी या बेळगावच्या कन्येचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी टी टोस्ट अँड कंपनीचे अध्यक्ष कटारिया, राहल केदनुरकर, अक्षय कुलकर्णी यांनी जल्लोषी वातावरणात तिचे स्वागत केले. रती हुलजी ही जरी मुंबईत वाढली असली तरी तिचा जन्म बेळगावात झाला असल्याने बेळगावकरांच्यावतीने तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिला शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तिच्या हस्ते केक कापून अभिनंदन देखील करण्यात आले.
यावेळी रतीने बेळगावकरांचे आभार मानून प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.