प्रवीण जाधव / रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेच्यावतीने चर्मालय येथे बसवण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीचा प्रथमच अत्यसंस्कारासाठी वापर करण्यात आल़ा मंगळवारी दुपारी रत्नागिरीतील फाटक प्रशालेचे माजी पर्यवेक्षक विनायक मुसळे यांच्यावर नातेवाईकांच्या संमतीने हे अत्यंस्कार करण्यात आल़े पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही शवदाहिनी पारंपरिक अत्यसंस्कारासाठी सक्षम पर्याय ठरू शकते.
पारंपरिक पद्धतीने होणाऱया अत्यसंस्कारामुळे प्रदुषण व वृक्षतोड वाढते. यासाठी गॅस व विद्युत शवदाहिनीचा पर्याय मोठय़ा शहरांमध्ये स्वीकारण्यात आला आह़े हीच बाब लक्षात घेवून रत्नागिरी नगर परिषदेतर्फे मजगांव रोडवरील चर्मालय येथे स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसवण्यात आल़ी यासाठी सुमारे 35 लक्ष रूपयांचा निधी खर्ची करण्यात आल़ा या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व नगर परिषद रत्नागिरी यांच्याकडून पुढाकार घेण्यात आला होत़ा
सर्वसामान्यपणे नागरिकांचा कल पारंपरिक अत्यंसंस्कार करण्यावर असत़ो त्यामुळे या शवदाहिनीला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे केवळ प्रायोगिक तत्वावर चर्मालय येथे ही शवदाहिनी बसवण्यात आल़ी पर्यावरणपूरक असणाऱया या शवदाहिनीला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात अशा आणखी शवदाहिनी बसवण्याचा विचार असल्याचे नगर परिषदेच्यावतीने सांगण्यात आले आह़े यासाठी लाकडाच्या वापरापेक्षा गॅस दाहिनीच्या वापरासाठीचे शुल्कही कमी ठेवण्यात आले आहे.
या गॅस शवदाहिनीसाठी पीएनजी गॅसचा वापर करण्यात येत़ो लाकडांचा वापर करून अत्यंसंस्कार करण्याची पद्धत खर्चिक असून त्यासाठी वेळही अधीक लागत़ो मात्र गॅस शवदाहिनीमध्ये कमी वेळेत व पर्यावरण पुरक पद्दतीने अंत्यसंस्कार होत असल्याने त्याला मोठय़ा महानगरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आह़े
रत्नागिरीमध्ये गॅस शवदाहिनीमध्ये झालेल्या पहिल्या अंत्यसंस्कारासाठी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते. यातील बहुतेकांनी तेथे कार्यरत तंत्रज्ञ मधु यांच्याकडून या दाहिनीबद्दल माहिती विचारून घेतली. काही उत्साही मंडळींनी तर या घटनेचे चित्रिकरणही केले. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच या सुविधेबद्दल नगर परिषदेचे कौतुक केले आहे.
शवदाहिनीच्या शुल्काबाबत गोंधळ
चर्मालय येथील स्मशानभूमी येथे नगर परिषदेतील हद्दीतील व्यक्तीच्या लाकूड वापरून पारंपरिक अत्यसंस्कारासाठी 1 हजार तर गॅस शवदाहिनीसाठी 500 रूपये आकारण्यात येतील असा फलक लावण्यात आला आह़े त्यासाठी 29 डिसेंबर रोजी ठराव केल्याचे फलकावर नमूद करर्यात आले आहे. मात्र तेथे कार्यरत प्रतिनिधीकडे नगर परिषदेने दिलेल्या पत्रामध्ये हेच दर अनुक्रमे 1500 व 1000 असे नमूद करण्यात आले आहेत. शुल्काबाबतच्या या परस्पर भिन्न नोंदींमुळे पहिल्याच अंत्यसंस्कारावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नगर परिषदेशी संपर्क साधला असता फलकावर प्रदर्शित केल्याप्रमाणे शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले. ही शवदाहिनी आजपासून प्रत्यक्ष कार्यरत होत असल्याची माहितीही संबंधित विभागाला नव्हती. तेथे नेमण्यात आलेल्या कर्मचाऱयाने ही बाब संबंधितांच्या नजरेस आणून दिली. मात्र या दोन घटनांमुळे नगर परिषदेतील कामकाजातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.