प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील आरोग्य मंदिर येथे नव्याने सुरू झालेल्या औषध दुकानातील 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल़े आहेत यामुळे शहरात खळबळ उडाली आह़े कर्मचारी पॉझिटिव्ह असतानाही हे दुकान मंगळवारी सुरू ठेवण्यात आल्याचे लक्षात येताच आरोग्य विभागाकडून ते बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़
आरोग्य मंदिर येथे प्रशस्त जागेत असलेल्या या औषधालयात कायमच गर्दी असत़े मंगळवारी या औषध दुकानातील 4 कर्मचाऱयांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल़ी त्यांनी तातडीने या ठिकाणी भेट दिल़ी यावेळी दुकान मालकाने अत्यावश्यक सेवा देत असल्याने दुकान बंद करणार नसल्याचे सांगितल़े यावेळी आरोग्य कर्मचारी व दुकान मालक यांच्यात वाद निर्माण झाल़ा दरम्यान या दुकानातील अन्य 22 कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचा अहवाल येईपर्यंत तरी दुकान बंद ठेवा, अशी विनंती आरोग्य विभागाकडून करण्यात आल़ी तरीही मंगळवारी दुकान सुरूच ठेवण्यात आले. त्यानंतर दुकान बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आला. गरज लागल्यास पोलिसांची मदत घेवून दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत़े दरम्यान औषध दुकान चालकाच्या बेजाबदार वागण्यामुळे कोरोना रूग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आह़े
जिह्यात 31 नवे रूग्ण
मंगळवारी जिह्यातील 7 तालुक्यांमध्ये कोरोनाचे 31 नवे रूग्ण आढळून आले आहेत़ यामुळे जिह्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 10 हजार 149 झाली आह़े राजापूर तालुक्यातील 75 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात झालेल्या 599 कोरोना चाचण्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 25 तर ऍन्टीजेन चाचणीत 6 असे 31 नवे रुग्ण आढळल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 8, खेड 2, दापोली 2, चिपळूण 15, संगमेश्वर 2, मंडणगड 1 व लांजातील 1 रुग्णाचा समावेश आहे. मंगळवारी बरे झालेल्या 36 जणांना घरी सोडण्यात आल़े बरे झालेल्या रूग्णांची संख्या 9 हजार 602 व प्रमाण 94.61 झाले आह़े जिह्याचा मृत्यूदर 3.63 पर्यंत पोचला आह़े
सावर्डेत 11 कोरोनाबाधित सापडले
चिपळूण तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मंगळवारी तालुक्यात 15 नवे कोरोना रूग्ण आढळले असून त्यामध्ये तब्बल 11 जण सावर्डे परिसरातील तर उर्वरित मंगळवारी रामपूर, फुरूस येथील आहेत. यामध्ये 8 जण हे सावर्डेतील एकाच चाळीतील आहेत. या चाळीत 2 दिवसांपूर्वी दोघे बाधित सापडल्यानंतर झालेल्या तपासणीत मंगळवारी आणखी 11जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
खेडमध्ये दोन दिवसात कोरोनाचा एकही रूग्ण नाही
खेड तालुक्यात गेल्या 2 दिवसात कोरोनाचा एकही रूग्ण न सापडल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे रूग्ण सापडलेल्या गावांमध्ये सर्वेक्षणाची मोहीम सुरूच असून कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेल्या गावांवरही आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत केले आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1604 आहे.
जिल्हय़ातील कोरोनाची स्थितीः
एकूण रूग्ण-10149
नवे रूग्ण -31
नवे मृत्यू -01
एकूण मृत्यू -369