कर्नाटक पोलिसांच्या कारवाईत खळबळजनक माहिती उघड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कर्नाटकातील कारवार येथे बनावट नोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीत खळबळजनक माहिती उघड झाली आह़े सुमारे 9 लाख रूपयांच्या बनावट नोटा रत्नागिरीत अधिकृत चलनी नोटांमध्ये मिसळणार होतो, असे या आरोपींनी सांगितल़े मात्र त्यांचे अन्य साथीदार रत्नागिरीत कार्यरत आहेत का, या बाबत कर्नाटक पोलिसांकडून मौन बाळगण्यात आले आहे.
कर्नाटकातील कारवार येथील दांडेली ग्रामीण पोलिसांकडून बनावट नोटांचे रॅकेट चालवणारी टोळी 3 जून 2021 रोजी जेरबंद करण्यात आल़ी त्यांच्याकडून सुमारे 72 लाख किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्य़ा यावेळी पोलिसांकडून 6 जणांना अटक करण्यात आली होत़ी यामध्ये रत्नागिरीमधील किरण मधुकर देसाई (40, मजगांव रोड रत्नागिरी) व गिरीष पूजारी (42, जाकादेवी रत्नागिरी) यांना बनावट नोटांसह ताब्यात घेण्यात आले होत़े
दांडेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या 72 लाख रूपयांमधील 9 लाख रूपयांच्या बनावट नोटा किरण देसाई व गिरीष पूजारी हे रत्नागिरीत आणणार होत़े यासाठी किरण व गिरीष यांनी दांडेली येथे राहणारा शिवाजी कांबळे याला 4 लाख रूपये देवून 9 लाख रूपयांच्या बनावट नोटांचा व्यवहार केल़ा हा व्यवहार सुरू असतानाच दांडेली पोलिसांनी छापा मारून कारवाई केल़ी पोलिसांनी घटनास्थळी सर्च ऑपरेशन केले असता त्यांना एकूण 72 लाख रूपयांच्या बनावट नोटा शिवाजी कांबळे यांच्या घरी आढळून आल्य़ा किरण व गिरीष आपल्या ओळखीच्या माणसाच्या माध्यमातून कर्नाटक येथे गेले होत़े किरण व गिरीष हे दोघेही रत्ना†िगरी येथील रहिवासी आहेत़ त्यांच्या या बनावट रॅकेटच्या प्लॅनमध्ये अन्य कोणी सहभागी होते का, या बाबत कर्नाटक पोलिसांकडून माहिती देण्यात आली नाह़ी
करोडपती होण्यासाठी बनावट नोटांचा आधार
बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रत्नागिरीतील किरण व गिरीष यांचे अन्य साथीदार आहेत का, या बाबत तपास करण्यात येत आह़े दरम्यान आपल्याला बनावट नोटांच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावून करोडपती व्हायचे होत़े त्यासाठी कर्नाटकातील मित्राच्या मदतीने आपण कारवारला नोटा नेण्यासाठी आलो होतो, असा खुलासा संशयितांनी पोलिसांच्या तपासात केला आह़े
– युनूस गड्डेकर,
पोलीस उपनिरीक्षक, दांडेली ग्रामीण, कर्नाटक