प्रतिनिधी/ रत्नागिरी
दुकानांसमोर गर्दी होवू न देण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील 3 दुकानचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े कारोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होत़े मात्र दुकानचालकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने अखेर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा
शहरातील धनजी नाका येथील विघ्नेश्वर टोबॅको सेंटरचे मालक दिलीप रामचंद्र झगडे (59,ऱा जेलरोड रत्नागिरी), उमर ट्रेडर्सचे मालक सलीम अब्दुल्ला अकवाणी (46, ऱा धनजी नाका रत्नागिरी) व राधाकृष्णनाका येथील बेर्डे स्टोअर्सचे मालक नितीन पुरूषोत्तम बेर्डे (55, ऱा राम आळी रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी तक्रार दाखल केली होत़ी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दुकाने सुरू करताना दुकानांसमोर गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दुकानचालकांना देण्यात आले होत़े धनजीनाका येथील उमर ट्रेडर्स, विघ्नेश्वर टोबॅको सेंटर व बेर्डे स्टोअर येथे गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले होत़े त्या संबंधी सूचना दुकानचालकांना करण्यात आल्या होत्य़ा या सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बगड करत आहेत़