26 वर्षीय पीडितेची पोलिसांकडून सुटका
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील पॉश एरिया म्हणून ओळख असलेल्या आयटीआय नाचणे रस्त्यावरील इमारतीत वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आह़े या प्रकरणी शहर पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक करण्यात आल़ी तसेच वेश्या व्यवसायासाठी पुण्याहून आणलेल्या 26 वर्षीय पीडित तरूणीची पोलिसांकडून सुटका करण्यात आल़ी
मागील 2 वर्षापासून परजिह्यातील मुली आणून हा प्रकार सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आल़े रावसाहेब जगन्नाथ माळी (42, ऱा सांगली) व त्याच्यासोबत असलेली महिला अशा दोघांना पोलिसांकडून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आह़े शुक्रवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आह़े पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाचणे रस्त्यावरील आयटीआय येथील रहिवासी इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार येथे होत असलेल्या अनैतिक व्यवसायाची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून बोगस गिऱहाईक पाठवण्यात आले होत़े या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री होताच शहर पोलिसांकडून इमारतीच्या फ्लॅटमध्ये छापा टाकण्यात आल़ा यावेळी 26 वर्षीय पीडित मुलगी व तिच्याकडून वेश्या व्यवसाय चालवणारे दोघे संशयित पोलिसांना आढळल़े पोलिसांच्या चौकशीमध्ये पीडित तरूणी ही पुण्याहून आणली असल्याची माहिती समोर आल़ी तसेच येथे मागील 2 वर्षांपासून वेश्या व्यवसाय चालत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आल़ी या प्रकरणी पोलिसांनी रावसाहेब माळी व त्याच्यासोबत असलेल्या महिलेविरूद्ध भादांवि कलम 370 सह 34, तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 3,4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस उपनिरीक्षक मेहेर, पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक नार्वेकर, सावंत, गुरव, पोलीस शिपाई नाटेकर, मलबारी यांनी केल़ी
शहर परिसरात वेश्या व्यवसाची वर्षभरातील दुसरी घटना
रत्नागिरी शहर परिसरातील पॉश एरियात वेश्या व्यवसाय हातपाय पसरत असल्याचे समोर येत आह़े मागीलवर्षी ओसवालनगर येथील बंगल्यामध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याचा प्रकार उघडकीस आला होत़ा यावेळीही जिह्याबाहेरून आणलेल्या मुलींचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात होत़ा यांनतर नाचणे येथील घटना समोर आल्याने रत्नागिरी शहराच्या लौकीकाला गालबोट लागले आह़े