प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील 62 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आह़े तब्बल 12 दिवसांनी पुन्हा जिह्यात कारोनामुळे मृत्यू झाला आह़े दरम्यान जिह्यातील कोरोनामुळे होणाऱया मृतांचा एकूण संख्या 320 पर्यंत पोहचली आह़े तर शनिवारी नव्याने 23 रूग्णांची भर पडली असून रूग्णांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आह़े.
शनिवारी कोरोनाचे 102 चाचण्यांपैकी केवळ 23 रूग्ण आढळून आले आहेत़. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 15 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 8 कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 11, चिपळूण 4, संगमेश्वर 6, राजापूर येथे 2 रूग्ण आढळून आले आहेत़. जिह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 772 इतकी झाली आह़े. तर शनिवारी कोरोनापासून बरे झालेल्या 3 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 249 वर पोहचले आह़े जिह्यातील बरे होण्याचे पमाण 94.04 इतके आह़े.
मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 88, खेड 51, गुहागर 12, दापोली 32, चिपळूण 76, संगमेश्वर 33, लांजा 11, राजापूर 14 तर मंडणगडमध्ये 03 असे एकूण 320 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े कोरोना संबंधित कोणतीही लक्षणे असल्यास वेळेत तपासणी करून घ्यावी असे अवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आह़े.
एकूण रूग्ण-8772
नवे रूग्ण -23
नवे मृत्यू -01
एकूण मृत्यू -320