प्रतिनिधी / संगमेश्वर
तालुक्यातील अणदेरी येथील ५६ वर्षीय वृध्द कृष्णा होडे यांचा नदीच्या पाण्यात पडुन मृत्यु झाला असून संगमेश्वर पो.ठाण्यात आकस्मित म्हणुन नोंद करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहीती नुसार गुरुवारी सकाळी शास्त्री नदीत 10 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना एक इसम नदीच्या पाण्यात पडलेला दिसुन आला ,जवळ जावुन पाहीले असता तो अणदेरी येथील रहाणारा कृष्णा गोपाळ होडे वय सुमारे ५६ असल्याचे पहाताच त्याचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले याची खबर त्याच्या घरच्याना दीली तर अणदेरी गावचे पो.पाटील श्री.महेद्र होडे यांनी संगमेश्वर पोलिसाना कळवले खबर मिळताच संगमेश्वर पोलिस घटना स्थळी जावुन पहाणी करुन पंचनामा केला व कृष्णाचा मृत्तदेह शवविच्छदनासाठी संगमेश्वर ग्रामिण रुग्णालयात पाठवण्यात आला त्यावेळी कृष्णाचा मृत्यू हा पाण्यात पडल्याने झाल्याचे प्राथमिक अंदाजात दिसुन येत आहे.
कृष्णाच्या पश्र्चात पत्नी ,मुलगा व विवाहीत मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.