रत्नागिरी/प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची रत्नागिरी अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली असुन एक डॅशिंग महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
जयश्री देसाई यांनी यापूर्वी 2012-2013 मध्ये रत्नागिरीत परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. या वर्षभराच्या कालावधीत त्यांनी रत्नागिरीत उत्तम कामगिरी करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.