मच्छिमार्केट-धनजीनाका रोडवरील घटना
एटीएमची तोडफोड पण रोकड हाती लागण्यात अपयश
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील धनजीनाका ते मच्छीमार्केट रोडवरील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, तोडफोडही केली. सुदैवाने एटीएम मधील रोकड अबाधित राहिल्याचे समोर आले. एटीएमची तोडफोड करताना चोरट्यांचे कृत्य तेथील सीसीटीव्हीत कैद झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. लवकरच चोरटे सापडतील असा विश्र्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.